Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘फेड एक्स्प्रेस’चे ऐतिहासिक विम्बल्डन विजेतेपद
ऐक्य समूह
Monday, July 17, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: sp1
5लंडन, दि. 16 (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डन पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या मरिन चिलिचचे आव्हान सरळ सेटस्मध्ये परतवून लावत विम्बल्डचे आठवे ऐतिहासिक विजेतेपद रविवारी पटकवले.
सेंटर कोर्टवर रविवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात फेडररने मरिनला  6-2, 6-1, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभूत करत विम्बल्डन करंडकावर आठव्यांदा नाव कोरले. फेडररने यापूर्वी पीट सॅम्प्रसच्या सात विम्बल्डन विजेतेपदांची बरोबरी केली होती. मागील वर्षी विम्बल्डनमधून फेडररला लवकर गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र, जिद्दी फेडररने यंदा जोरदार खेळ करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे ही स्पर्धा जिंकून फेडरर सॅम्प्रसला मागे टाकणार का, याकडे फेडररच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. सेंटर कोर्टवर रंगलेल्या अंतिम सामन्यात फेडररने सुरुवातीपासूनच मजबूत पकड घेतली. फेडररने पहिला सेट 6-1 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये त्याने मरिन चिलिला केवळ एकच गुण मिळवून दिला. दोन सेटमधील पिछाडीनंतर फेडरर या सामन्यात बाजी मारणार हे स्पष्ट झाले. तिसर्‍या सेटमध्ये मरिनने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेनिसच्या या सम्राटाने तिसरा सेट 6-4 असा खिशात घालत विक्रमी विजेतपदावर शिक्कामोर्तब केला.
वयाच्या 35 व्या वर्षी विम्बल्डन जिंकून फेडररने आणखी एक विक्रम नोंदवला
आहे. सर्वाधिक वयस्कर विम्बल्डन
विजेता म्हणून फेडरर ओळखला जाईल. यापूर्वी 1975 साली आर्थर अ‍ॅश यांनी
31 वर्षे 11 महिने आणि 25 दिवस
या वयात विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते.  तब्बल 43 वर्षे अबाधित असणारा विक्रम अ‍ॅश यांचा विक्रम फेडररने
मोडीत काढला. विम्बल्डनचे आठव्यांदा विजेतपद आणि सर्वात वयस्कर
खेळाडू होण्याचा करिश्मा करत फेडररने दुहेरी विक्रम रचला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: