Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

अँटिबायोटिक्सचे दुष्परिणाम
vasudeo kulkarni
Monday, July 24, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: vi1
आजवर विविध प्रकारच्या उपचार पद्धतीच्या सहाय्याने व्याधींवर मात करण्याचे तसेच रोगाच्या प्रसाराला आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले. अलीकडे तर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळू लागली आहे. त्यामुळे दुर्धर आजारावरील प्रभावी उपचार पद्धती अस्तित्वात आणणे शक्य होत आहे. अशा तर्‍हेने अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याद्वारे तत्कालीन आजारांबाबत रुग्णांना दिलासा मिळणे शक्य झाले. काही संसर्गजन्य विकार तर बर्‍याच प्रमाणात आटोक्यात आले.
अनेक संशोधकांनी अथक परिश्रमातून विकारांवर मात करणारी प्रणाली शोधून काढली. आजही विविध विकारांबाबतचे संशोधन सुरू आहे. याचा अर्थ वैद्यकीय क्षेत्रासमोर सतत कोणत्या ना कोणत्या विकारावर मात करण्यासाठी उपचार शोधण्याचं आव्हान कायम आहे. बदलत्या काळानुरूप काही नवे विकार डोकं वर काढत आहेत. सद्य:स्थितीत मधुमेह, हृदयविकार यांचं वाढतं प्रमाण हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. या मागील कारणांबाबत वेळोवेळी चर्चा केली जाते. ती कशी दूर करावीत हेही सांगितलं जातं. दुसरीकडे या विकारांवर वेळीच कशी मात करता येईल, याबाबतचं संशोधनही अव्याहतपणे सुरू आहे.
वैद्यकीय क्षेत्रासमोरील आणखी एक आव्हान म्हणजे ठरावीक उपचारांचा त्या त्या विकाराच्या जंतूंवर प्रभाव कमी होत जाणं. एखाद्या विकारावर विशिष्ट औषध कामी येतंय, असं लक्षात आल्यावर त्यावरच भर दिला जातो. परंतु कालांतराने त्या आजाराचे जंतू वा विषाणू या औषधालाही जुमानत नाहीत, असे दिसून येते. त्या औषधाचा प्रतिकार करण्याची शक्ती ते आपल्या ठायी निर्माण करतात. त्यामुळे त्या औषधाच्या वापराने संबंधित विकारावर मात करता येत नाही, असे दिसून येते.
या पार्श्‍वभूमीवर अलीकडच्या काही संशोधनांमधून अँटिबायो-टिक्सच्या वापराचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समोर येऊ
लागले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्स शक्य तितकी टाळली पाहिजेत.
पावसाळ्यात शरीराची स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात मूत्रविकारग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यांच्यावर केलेल्या अँटिबायोटिक्सच्या प्रयोगाला काही बॅक्टेरिया दाद देत नसल्याचे दिसून आल्यामुळे मूत्रिपडाच्या आजारांनी मरण पावणार्‍यांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे दिसून आले आहे.
यावर केवळ गोळ्या देऊन उपचार करणे कठीण बनत चालले असून रुग्णांना इंजेक्शन द्यावीच लागत असल्याचे मूत्रविकार-तज्ज्ञांच्या निरीक्षणातून समोर आले. शिवाय अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या उपचारांमुळे आणि काही वेळा बॅक्टेरियांमधील वाढत्या प्रतिरोधक शक्तीमुळे इंजेक्शनचाही उपयोग होत नसल्याचे दिसून
येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या विकारावर विशिष्ट औषध कामी येतेय, असे लक्षात आल्यास त्यावरच भर दिला जातो; परंतु कालांतराने त्या आजाराचे जंतू त्या औषधालाही जुमानत नाहीत, असे दिसून येते. अँटिबायोटिक्सच्या वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: