Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

वक्ता नरेंद्र
ऐक्य समूह
Saturday, July 29, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: vc1
स्वामी विवेकानंदांचे लहानपणीचे नाव होते नरेंद्र. या नरेंद्राच्या शाळेतील एक शिक्षक निवृत्त होणार होते. विद्यार्थ्यांचे ते लाडके शिक्षक असल्याने त्यांनीच आपल्या गुरुजींसाठी एक निरोप समारंभ आयोजिला होता. समारंभाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक पंडित ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांना आमंत्रण होते. ते बंगालमधील एक ख्यातनाम विद्वान आणि देशभक्त होते. आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊनही इंग्रजांची चाकरी करायची नाही असे ठरवून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले होते. तसेच ते पट्टीचे वक्ते हेते. अशा व्यक्तीसमोर आपल्यापैकी कोणी भाषण करायचे असा प्रश्‍न समारंभ आयोजित करणार्‍या मुलांना पडला. शेवटी नरेंद्रावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. अन् नरेंद्राने खरोखरच फार सुंदर भाषण करून सर्वांची मने जिंकली. भावमधुर शब्द आणि ओघवते वक्तृत्व यामुळे त्याचे बोलणे ऐकताना सर्वजण भारावून गेले. स्वत: ईश्‍वरचंद्रांनी त्याची पाठ थोपटली आणि आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले! हाच नरेंद्र जेव्हा पुढे स्वामी विवेकानंद झाला, तेव्हाही आपल्या अमोघ वक्तृत्वाने त्यांनी जग जिंकले. शिकागोतील सर्व धर्म परिषदेप्रमाणे अमेरिका, युरोप आणि भारतातील सर्व व्याख्याने गाजली.
कथा उपदेश : शालेय जीवनात व वक्तृत्वाला सुरवात केल्यास भावी काळात हमखास यश प्राप्त होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: