Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गोगावलेवाडीतील युवकाला अटक
ऐक्य समूह
Monday, August 07, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re3
5कोरेगाव, दि. 6 : कोरेगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर कास परिसरातील एका लॉजवर अत्याचार केल्या प्रकरणी गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील राहुल विलास बेबले याच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करुन त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
संबंधित मुलगी कोरेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, ती दि. 1 ऑगस्ट रोजी घरातून महाविद्यालयात जाते असे सांगून बाहेर पडली ती घरी परतलीच नाही. घरातील  लोकांनी तिचा शोध केला असता ती सापडली नाही. अखेरीस तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात राहुल बेबले याने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यानच्या काळात राहुल बेबले याने कोरेगाव येथील बसथांब्यावरुन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आणि कास परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी शुक्रवार, दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री राहुल बेबले यास अटक केली. शनिवारी त्याला सातारा येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: