Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोर्टी येथे कार उलटून 1 ठार
ऐक्य समूह
Thursday, August 10, 2017 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
5उंब्रज, दि. 9 : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी, ता. कराड गावच्या हद्दीत भरधाव वेगातील कार पलटी होऊन गंभीर जखमी झालेल्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सुबोत सखाराम विरलत (वय 26, रा. भायखळा, मुंबई) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावरून   भरधाव वेगात जाणारी कार पलटी झाल्याने कारमधील एकजण जखमी झाला होता. त्यास कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची नोंद आज उंब्रज पोलिसात झाली असून तपास सहाय्यक फौजदार ए. जी. तावडे करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: