Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

बळीची अवस्था
ऐक्य समूह
Friday, August 11, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: vc1
राजा बळी महान व्यक्तिमत्व असलेला पूज्य पुरुष होता. भगवान विष्णूने वामनरूप घेतले आणि बळीला पाताळात लोटले. त्याची मनस्थिती कशी आहे हे पाहण्यास विष्णू नारदाला म्हणाला, ‘नारदा ! एकदा बळीला भेटून ये.’ त्याप्रमाणे नारद बळीकडे गेले. बळीने त्यांचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. नारद म्हणाले, ‘तू राज्यभ्रष्ट झालास. तुझे सर्व गमावले. आता तू कसा राहातोस हे प्रत्यक्ष पहावे म्हणून मी आलो.’ आपली अवस्था सांगताना बळी म्हणाला, ‘नारदा ! मी खरोखर समाधानी आहे. कारण जीवनामध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही. कोणतीही घटना निश्‍चित नाही. काळ सर्वांवर स्वामित्त्व गाजवतो. काळाचे अद्भूत रहस्य ओळखून मी कोणत्याही अवस्थेचे फार सुख-दु:ख करीत नाही. काळ देतो व तोच हरण करतो. भविष्याच्या पोटात काय असते कोणास ठाऊक ! म्हणून मी देह काळाच्या स्वाधीन करून मनाने स्वरूपचिंतन करतो. मला काळाचे बंधन नाही.’

कथा उपदेश : भक्ताला काळाचे बंधन नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: