Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

यातना
ऐक्य समूह
Wednesday, August 23, 2017 AT 11:24 AM (IST)
Tags: vc1
अब्राहम लिंकन यांच्या जीवनातील कथा. एकदा ते सिनेटच्या बैठकीला निघाले होते. वाटेत त्यांनी पाहिले की, रस्त्याकडेच्या एका खड्ड्यातील चिखलात एक डुक्कर अडकले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी ते केविलवाणी धडपड करत होते. पण होत होते मात्र उलटेच. अखेर लिंकन तेथे गेले. त्यांनी त्या डुकराला चिखलातून बाहेर काढले. या प्रयत्नात त्यांच्या कपड्यांना खूपच चिखल लागला पण ते बदलण्यास वेळ लाग़ेल म्हणून अखेर ते तसेच बैठकीला गेले. कपडे खराब का? हे इतर सदस्यांनी विचारण्यापूर्वीच त्यांनी सर्व प्रकार सांगितला. सगळे सदस्य त्यांच्या भूतदयेबद्दल कौतुक करू लागले. ते थांबवत लिंकन म्हणाले, ‘तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या डुकरावर दया दाखवण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. त्याची केविलवाणी धडपड मला पाहवेना. माझ्या मनाला खूप यातना होऊ लागल्या. माझ्या हृदयातील कालवाकालव दूर व्हावी म्हणून मी हे सारं केलं. यात मदत झाली असेल तर ती मलाच झाली आहे.’
कथा उपदेश : दुसर्‍याच्या यातना कमी केल्याने मनाला समाधान लाभते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: