Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फायरिंग करताना राऊंड बॅक फायर
ऐक्य समूह
Thursday, August 24, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: lo2
झाल्याने पोलीस कर्मचारी जखमी
5सातारा, दि. 23 : फायरिंगची प्रॅक्टिस करताना राऊंड बॅक फायर होवून छर्रे तोंडावर उडाल्याने सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रवीण पवार हे जखमी झाले. यामध्ये त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने झालेली दुखापत किरकोळ असून त्यांचा डोळा वाचला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या चार दिवसापासून जिल्हा पोलीस दलाची म्हसवे येथील पोलीस मैदानावर   फायरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे. बुधवारी सकाळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांचे फायरिंग प्रॅक्टिस घेण्यात आले. यामध्ये एसएलआरचे दहा राऊंड आणि इन्सासचे दहा राऊंड फायर करण्याचे प्रॅक्टिस केले जाते. प्रवीण पवार यांनी सकाळी 9 च्या सुमारास एसएलआरचे दहा राऊंड व्यवस्थित फायर केले. त्यानंतर इन्सासचे 6 राऊंड व्यवस्थित फायर केले. सातवा राऊंड फायर करताना राऊंड बॅक फायर झाले आणि ही दुर्घटनाघडली. दुर्घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणी केल्यानंतर जिथे लागले आहे तिथे पट्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. सायंकाळी पुन्हाएकदा तपासणी करून कसेउपचार करायचे याचा निर्णय घेवू, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रवीण पवार हे सातारा एस.टी. स्टँडच्या चौकीत कार्यरत असतात. दवाखान्यातून त्यांनी थेट आपल्या कर्तव्याचे ठिकाण गाठले. मात्र त्यानंतर शहर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी त्यांना आराम करण्याच्या सूचना दिल्या.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: