Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

प्रयत्न, परिश्रम अन परमेश्‍वर
ऐक्य समूह
Wednesday, August 30, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: vc1
ही गोष्ट साधारण 1937-38 सालातली आहे. सोळा-सतरा वर्षाचे युवा नौशाद लखनौहून काहीतरी कामगिरी करण्यास बाहेर पडले होते. मुंबईत एक विद्वान प्राध्यापक नामीसाहेब कुलाब्यात राहात. त्यांच्या घरी ओळखीनं नौशाद राहात व दिवसभर कामाच्या शोधात स्टुडिओतून फिरत असत. मुंबईच्या भुलभुलैयात गरीब स्वभावाच्या नौशादचे पाकीट हरवले. जवळच पुंजी संपली. पण त्यांनी प्रयत्न मात्र सोडले नाहीत. कुलाब्या-पासून दादरपर्यंत पायी चालून आलेल्या व दमून झोपलेल्या नौशादाकडे नामीसाहेबांचे लक्ष गेले. त्यांचे जोडेदेखील फाटून गेले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना नौशादकडून सर्व हकीकत समजली. पैशाशिवाय या मुंबईत चिकाटीनं राहणार्‍या नौशादचं त्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, ‘तू एक दिवस मोठा माणूस होणार आहेस व त्यावेळी मी तुला नक्की भेटेन.’ त्यानंतर स्वत: गरीब असलेल्या नामीसाहेबांनी त्यांना थोडे पैसे दिले व नौशाद यांच्या डायरीत आपले शब्द टिपून ठेवले. पुढे काळ गेला धर्मपारायण नौशाद यांनी परिश्रमानं, प्रयत्नानं चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं. स्वत:ची मोठी वास्तू केली. ‘बैजू बावरा’च्या यशानं त्यांचं नाव गाजू लागलं. एके दिवशी नामीसाहेब त्यांना भेटायला आले व त्यांना डायरीतल्या पत्राची आठवण करून दिली. त्यांचे शब्द खरे झाले होते.
कथा उपदेश : प्रयत्न आणि परिश्रमाच्या जोडीला परमेश्‍वरावर श्रद्धा असेल तर जीवनात यश नक्की आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: