Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
यासीन भटकळवर आरोपनिश्‍चिती जामा मशीद स्फोट प्रकरण
ऐक्य समूह
Wednesday, August 30, 2017 AT 11:28 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीजवळ 2010 मध्ये झालेल्या स्फोट आणि गोळीबार प्रकरणी स्थानिक न्यायालयाने ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक यासीन भटकळ याच्याविरोधात आज आरोप निश्‍चित केले. या प्रकरणी पतियाला हाऊस न्यायालयात 23 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
या प्रकरणी न्यायालयाने यापूर्वी ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या सैय्यद इस्माइल आफाक, अब्दुस सबूर आणि रियाज अहमद सईदी यांना आरोपमुक्त केले होते. या तिघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे न्यायालयाने सांगितले होते. पोलिसांनी यासीन भटकळसह संघटनेच्या तीन सदस्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या दरम्यान परदेशी खेळाडूंना आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणार्‍या परदेशी नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 19 सप्टेंबर 2010 रोजी जामा मशिदीजवळ स्फोट झाला होता. स्फोटाच्या आधी ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दोन दहशतवाद्यांनी एका बसवर गोळीबार केला होता. त्या बसमधून परदेशी नागरिक उतरत होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: