Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गणपतीसमोर लाईटच्या माळा लावताना विजेचा धक्का बसून वृद्धाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, August 31, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 30 :राहत्या घरी गणपतीसमोर लाईटच्या माळा लावत असताना विजेचाधक्का बसून विजय शंकर भोसले (वय 60, रा. तासगाव, ता. सातारा) हे बेशुद्ध झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: