Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चोरे येथे जुुगार अड्ड्यावर छापा
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re6
दोन लाखांसह सहा जण ताब्यात
5उंब्रज, दि. 31 : चोरे, ता. कराड येथे तीन पानी जुगार खेळत असताना उंब्रज पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  उंब्रज पोलिसांनी कारवाई गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरे, ता. कराड येथील कुटाळे नावाच्या शेतात झाडाच्या आडोशाला जुगाराचा डाव चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार उंब्रज पोलिसांनी छापा टाकला. यावेळी श्याम गजानन जंगम वय 27, नरसिंह बाबूराव जगताप वय 62, आप्पासाहेब मानसिंग साळुंखे वय 60, मधुकर तुकाराम भिसे वय 62, प्रकाश ज्ञानू कवळे वय 45, मधुकर भालचंद्र सोनटक्के वय 44, सर्व रा. चोरे, ता. कराड आदी झुगार खेळताना पोलिसांना आढळून आले त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान तीन पानी जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा मारल्याने पत्ते खेळणारांची भंबेरी उडाली. यावेळी कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल व चार दुचाकी गाड्यासह सुमारे दोन लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. डी. मयेकर, अभिजित पाटील, आण्णासाहेब मारेकर, ए. जे. भुजबळ यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजी जगताप हे करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: