Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विडणी येथून मुलाचे अपहरण करुन सोमंथळीनजीक फेकले
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:30 AM (IST)
Tags: re2
5फलटण, दि. 1 : विडणी, ता. फलटण येथील रोशन खंडू राऊत (वय 12) या मुलास इंजेक्शनद्वारे बेशुध्द करुन अनोळखी व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला फलटण-बारामती मार्गावर सोमंथळीनजीक गाडीतून रस्त्यावर फेकून देवून गाडी पुढे निघून गेल्याचे समजते. या गाडीत आणखी 3/4 बेशुध्द अवस्थेत मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे  विडणी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुजबळ वस्ती, विडणी, ता. फलटण येथील रोशन खंडू राऊत हा 12 वर्षाचा मुलगा सहावीमध्ये उत्तरेश्‍वर हायस्कूलमध्ये शिकत आहे. शुक्रवारी गणेश विसर्जनामुळे सकाळी शाळा घेवून दुपारी सुट्टी देण्यात आल्याने रोशन राऊत हा घराशेजारी बसविण्यात आलेल्या सार्वजनिक गणपती परिसरात अन्य मुलांसोबत खेळत असताना लगत असलेल्या कडवळ / टोमॅटोच्या शेतात कुत्रे भुंकताना ऐकायला आल्याने तो कुत्रे कुणाला भुकतात हे पाहायला गेला असता  कडवळाच्या शेतात दबा धरून बसलेल्या अनोळखी व्यक्तीनी त्यास  तोंड दाबून ओढून नेत त्यास भुलीचे इंजेक्शन देऊन शेतापासून 500/600 मीटरवर गावातील मुख्य डांबरी रस्त्यावर उभ्या असणार्‍या ओमनी गाडीत आणून टाकून गाडी सोमंथळीच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात येते. फलटण-बारामती महामार्गावर राधिका गार्डन कार्यालयाशेजारी      पोलीस व्हॅन असल्याचे निदर्शनास आल्याने मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर आत सोमंथळी गावच्या बाजूस असलेल्या ओढ्याजवळ संबंधित मुलास गाडीतून फेकून देऊन गाडी पुढे निघून गेली. मात्र, सदर मुलास भुलीचे इंजेक्शन अर्धवट चढल्याने त्याची जीभ जड झाल्याने बोलता येत नव्हते. 
सोमंथळीनजीक ओढ्याजवळ फेकून दिलेल्या ठिकाणाहून थोडा शुध्दीवर आलेला रोशन राऊत   भयभीत अवस्थेत गावच्या दिशेने धावू लागला असता शेतात काम करणार्‍या लोकांनी  बोलावून पाणी पाजून त्याची माहिती घेतली. त्याचे नाव, पत्ता विचारुन दुचाकी गाडीवर घरी आणून सोडून घरातील लोकांना सदर घटनेची माहिती दिली. घरातील लोकांनी त्वरित त्यास विडणीतील खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी आणले असता डॉक्टरांनी  त्याची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगून तो भयभीत झाला. त्यास थोडेसे आराम करण्याचा सल्ला दिला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर मुलाची व त्याच्या आई-वडिलाची घटनेबाबत सविस्तर माहिती घेवून तपास सुरू केला आ
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: