Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

ऐट
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: vc1
एका गृहस्थाच्या घरी एक दिवस एक खास मित्राला मेजवानी होती. त्याचा एक कुत्रा होता. त्यानेही आपल्या एका दोस्त कुत्र्याला त्याच दिवशी आपल्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले. तो कुत्रा जेव्हा आला तेव्हा तयार होत असलेले चमचमीत जेवणाचे पदार्थ पाहतच राहिला. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या तो म्हणाला, काय मस्त मेजवानी मिळणार आज. अगदी पोट फुटेपर्यंत मी आज खाणार आहे. मग पुन्हा परवा सकाळपर्यंत पुन्हा खायला नको.
आपल्या मित्रांवरच प्रेम दाखविण्याकरता तो आपली शेपटी हालवत राहिला. पण त्या शेपटीच्या वळवळ्यामुळे तिथल्या स्वयंपाक्याचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्याने ताबडतोब त्याचे पाय धरून त्याला घराबाहेर फेकून दिले. अर्थात रागाने आणि निराशेने भुकंत भुकंत तो आपल्या घरी निघाला. वाटेत त्याला त्याचा दुसरा मित्र भेटला. त्याने विचारले, काय कसं काय होतं जेवण? काही विचारू नको, तो म्हणाला, अरे, तेथे इतकी दारू होती की, मी तिच्यावर ताव मारला. त्या घरातून मी कसा बाहेर पडलो ते देखील मला समजत नाही.
कथा उपदेश : दुसर्‍याच्या जीवावर जे जे आपल्याला चांगल्या गोष्टी देण्याचा आव आणतात त्यांच्यावर विश्‍वासून चालणे बरे नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: