Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘बिनधास्त कराडकर’ विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 12 : कराड शहराशी संबंधित असलेल्या बिनधास्त कराडकर, कराडचा भन्नाट बानू, जय कराडकर या तीन फेसबुक पेजवरून लोकप्रतिनिधी असलेल्या पालिकेतील नगरसेवकांची बदनामी सुरू असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली आहे.
तीन फेसबुक पेजवर अज्ञात व्यक्तीकडून नगरसेवकांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांना सार्वजनिक जीवनात ओळखल्या जाणार्‍या टोपण नावांचा उल्लेख करून शिवराळ व गलिच्छ भाषेत बदनामी करण्यात येत आहे. त्यावर अपलोड करण्यात येणारा मजकूर हा धादांत खोटा व नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. त्याद्वारे नगरसेवकांच्या बदनामीचे षडयंत्र सुरू असल्याने संबंधित अज्ञात व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी ही तक्रार पोलिसात दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक फौजदार खवळे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: