Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाक सैन्याच्या गोळीबारात तीन जवान जखमी
ऐक्य समूह
Thursday, October 05, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: na3
सलग तिसर्‍या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन
5जम्मू, दि. 4 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्याने सलग तिसर्‍या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान जखमी झाले आहेत. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
पाक सैन्याने काल (मंगळवार) केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला होता. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले. पाक सैन्याने नियंत्रण रेषेवर पूँछ जिल्ह्यातील लाक सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. याशिवाय पाक सैन्याने उखळी तोफांचाही मारा केला. त्यात भारताचे तीन जवान जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने तीव्र प्रत्युत्तर दिल्यानंतर पलीकडून होणारा गोळीबार बंद झाला. पाकिस्तानने मंगळवारीही नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. त्यामध्ये मूळचे नेपाळचे नागरिक असलेले भारतीय लष्कराचे नायक महेंद्र चेमजुंग यांना वीरमरण आले. ते मेंढर सेक्टरमधील चेरा येथील चौकीवर तैनात होते. 
पाकिस्तानकडून सोमवारपासून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सोमवारी करण्यात आलेल्या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: