Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वारस नोंदी करण्यासाठी लाच घेताना तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात
ऐक्य समूह
Thursday, October 05, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re3
5मेढा, दि. 4 : गांजे, ता. जावली येथील वडिलांच्या मृत्यूनंतर वारसाच्या नोंदी होण्यासाठी सन 2015 पासून पाठपुरावा करून सुद्धा नोंदी करण्यात आल्या नाहीत. या नोंदी करण्यासाठी तलाठी वसंत सूर्यवंशी यांनी 2 हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली. एसीबीने लावलेल्या सापळ्यात तलाठी वसंत सूर्यवंशी दोन हजाराची लाच घेताना सापडले. त्यांच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली.
वडिलांच्या मयत वारसाच्या नोंदी वारस नोंदवहीमध्ये घेण्यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा नोंदी केल्या नाहीत. या वारसाच्या नोंदी करण्यासाठी तलाठी वसंत सूर्यवंशी, वय- 56, रा. हडपसर यांनी 2 हजार रुपयाची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत कार्यालयाकडे  दि 3 ऑक्टोबर 2017 रोजी केली. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार दि. 4 ऑक्टोबर 2017 रोजी सापळा लावून तलाठी वसंत सूर्यवंशी यांना दोन हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.
तलाठी वसंत सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्यासह पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंदराव सपकाळ, संभाजी बनसोड, शंभू सपकाळ, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, विनोद राजे, संभाजी काटकर, श्रामती जमदाडे, मधुमती कुंभार आणि श्रद्धा माने यांनी कारवाईमध्ये भाग घेतला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: