Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खा. उदयनराजे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: re1
5भुईंज, दि. 11 : आनेवाडी टोलनाक्यावर जमावबंदीचे आदेश असतानासुद्धा गुरुवार, दि. 5 रोजी जमाव जमावल्या प्रकरणी खा.उदयनराजे भोसले आणि सुमारे 200 ते 250 जणांवर भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनात बदल होणारअसल्याने अशोका स्थापत्यकडून हा टोलनाका मायक्रोलाइन इन्फ्रा कंपनीकडे देण्यात येणार होता. परंतु टोलनाक्यावर काम करणार्‍या स्थानिक कामगारांना कमी करू नये, त्याचप्रमाणे दिवाळी सणानिमित्त आनेवाडी टोलनाक्यावरील कामगारांना बोनस मिळावा हे मुद्दे उपस्थित करून गुरुवार, दि. 5 रोजी सायंकाळी टोलनाका हस्तांतरास खा. उदयनराजे भोसले यांनी विरोध दर्शविला व जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केले म्हणून त्यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अशोक सावंत़, अजिंक्य मंगेश मोहिते, मुरलीधर भोसले, सुजित उर्फ गुन्या आवळे, राजू गोडसे, सनी मुरलीधर भोसले आणि अन्य अनोळखी 200 ते 250 जणांवर कलम 37 (3), 135, 143, 149 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास वाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि. बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सौ. रेखा दूधभाते करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: