Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उंब्रज-मसूर परिसरात अवैध दारुधंद्यांवर पोलिसांचे छापासत्र
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: re3
पावणे दोन लाखांचा दारूसह मुद्देमाल जप्त
5मसूर/कराड, दि.11: उंब्रज व मसूर परिसरात कराड विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने रविवारी व सोमवारी दोन दिवस विविध ठिकाणी छाप्पे टाकून अवैध दारूसह सुमारे 1 लाख 73 हजार 496 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना उंब्रज व मसूर परिसरात अवैध दारू धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवार, दि.8 व सोमवार, दि. 9 रोजी विविध ठिकाणी पोलीस पथकांकडून छापे टाकण्यात आले. यात रविवारी मसूर रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल सिद्धार्थचे पाठीमागील बाजूस विशाल युवराज माने (रा. बनवडी कॉलनी, कराड) हा दारूची अवैध विक्री करीत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे 8 हजार 480 रुपयांचा देशी विदेशी दारूचा माल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर  शिवडे गावच्या हद्दीत काजल चायनीजच्या पाठीमागे दारूची अवैध विक्री करण्यासाठी ठेवलेली देशी दारू व मोटरसायकल असा सुमारे 43 हजार 16 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 सोमवारी हणमंत दादा रामगुडे (रा. मसूर रेल्वे स्टेशनजवळ) हा केशरी रंगाची टाटा इंडिका कारमधून अवैध दारूची विक्री करण्यासाठी दारूची वाहतूक करताना मसूर ते तारगाव जाणार्‍या चौकात आढळून आला. त्याच्याकडून दारूचे 10 बॉक्स व वाहन असा सुमारे 1 लाख 22  हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रवींद्र चव्हाण, सागर बर्गे, संतोष चव्हाण, घाडगे, प्रवीण पवार, रमेश बरकडे, राऊत यांचा सहभाग होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: