Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणात आ. शिवेंद्रसिंहराजेंसह 150 जणांवर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:17 AM (IST)
Tags: lo1
अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
5सातारा, दि. 12 : सुरुचीवर गुरुवार, दि. 5 रोजी झालेल्या राड्या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल करण्याचे सत्र सुरुच आहे. शासकीय विश्रामगृहावर बेकायदा जमाव जमवून जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणात सातारा शहर पोलिसांनी आ.श्रीमंत शिवेंदसिंहराजे भोसले यांच्यासह 150 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या चार जणांच्या अर्जावर शुक्रवार, दि. 13 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  या चौघांशिवाय राजू भोसले यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज अ‍ॅड. धीरज घाडगे यांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला. या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश असतानाही दि. 5 रोजी संशयितांनी येथील शासकीय विश्रामगृहावर एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस हवालदार दीपक जोपळे यांनी तक्रार दिली आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयेंद्र चव्हाण, अतुल चव्हाण, बाळू खंदारे, गणेश भोसले, पंकज पवार, मयूर बल्लाळ, अनिकेत तपासे, रवी पवार, बबलू सोलंकी, राहुलसोनवणे, मुख्तार पालकर,   योगेश शिंदे, मुन्ना बागवान, नाना इंदलकर, बाळू दणाणे, सनी शिंदे, गोरख महाडिक, योगेश चोरगे, बाळासाहेब महामुलकर, फिरोज पठाण, अमित महिपाल, प्रवीण पाटील, अक्षय मोहिते, अक्षय कांबळे, अमोल मोहिते, आकाश नेटके, कैलास मायणे, संग्राम दणाणे, निशीकांत पिसाळ, दत्ता तोडकर, सागर काळोखे, अजिंक्य दणाणे, संतोष कांबळे, हिपू पठाण, रवींद्र खरात, किशोर माने, निखील जाधव, मिलिंद कुर्‍हाडे, गणेश गजरे, अर्जुन शिंदे, अन्सार आत्तार, राजू भोसले, हरी साळुंखे, प्रवीण तपासे, चेतन सोलंकी व इतर सुमारे 100 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चौघांना न्यायालयीन कोठडी
प्रारंभी अटक करण्यात आलेल्या हर्षल चिकणे, नितीन सोडमिसे, प्रतीक शिंदे व चेतन सोलंकी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात या चौघांसाठी दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली आहे. त्यावर या चौघांच्यावतीने अ‍ॅड.धीरज घाडगे यांनी जोरदार युक्तिवाद केला. एकच घटना घडली असून त्याचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. हे तिन्ही गुन्हे एकाच ठिकाणी घडलेले आहेत. तांत्रिकदृष्ट्या तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याच्या तपासातच संपूर्ण चौकशी झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा दुसर्‍या गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्यची आवश्यकता नाही. त्यानंतर त्यावर सायंकाळपर्यंत न्यायालयाने निकाल दिलेला नव्हता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: