Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकच्या गोळीबारात 2 जवान शहीद
ऐक्य समूह
Friday, October 13, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
5जम्मू, दि. 12 (वृत्तसंस्था) :जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी सकाळी केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून एका स्थानिक नागरिकालाही जीव गमवावा लागला.
कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाक सैन्याने आज सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी स्वयंचलित शस्त्रांच्या साह्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात टी. के. रेड्डी आणि मोहम्मद झहीर हे दोन जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही तत्काळ प्रत्युत्तर दिले. या भागात बराच वेळ गोळीबार सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. टी. के. रेड्डी हे जवान म्हणून कार्यरत होते तर मोहम्मद झहीर हे लष्करातील हमाल (पोर्टर) होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. लष्कराच्या नॉदर्न कमांडच्या ट्विटर अकाउंटवरून एका ट्विटद्वारे या वीर जवानांना सलाम करण्यात आला आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून वारं-वार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून 2 ऑक्टोबर रोजी पूँछ भागात झालेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. 3 ऑक्टोबर रोजी भिम्बेर सेक्टरमध्येही पाक सैन्याच्या गोळीबारात एका जवानाला वीर-मरण आले होते. 
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार 2017 मध्ये सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानने 600 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: