Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

सौरभ राजे,करण शिंदे यांनी मारली सेमी फायनलमध्ये धडक
ऐक्य समूह
Thursday, January 04, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: sp1
5सातारा, दि. 3 :  सातारा तालीम संघाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार तिसर्‍या दिवशीही सुरूच होता. तिसर्‍या दिवशी झालेल्या फाईटमध्ये सातारा बॉक्सिंग असोसिएशनच्या दोन बॉक्सरनी दिमाखदार फटके लगावत प्रतिस्पर्धी बॉक्सरला आपले तोंड सुद्धा वर काढू दिले नाही. त्यामुळे सातारचा सौरभ राजे आणि करण शिंदे या दोघांनी सेमी फायनलमध्ये
धडक मारली. तसेच पुण्याचा स्वप्निल शिंदे व क्रीडा प्रबोधिनीच्या अजय पेंडार यांनी दिमाखदार फाईट केली. रात्री उशिरापर्यंत फाईट सुरू होत्या. सातार्‍याच्या मान्यवर मंडळींनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देवून स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे काम केले.
बुधवारी सुरू झालेल्या फाईटमध्ये 46 ते 49 किलो वजनीगटात मुंबईच्या पंकज पाल आणि पुण्याच्या संकेत गौड यांच्यामध्ये झालेल्या फाईटमध्ये गुणांवर संकेतने फाईट जिंकली. मुंबईच्या शिवम विश्‍वकर्मा आणि क्रीडा प्रबोधिनीच्या शिवाजी गेडाम यांच्यामध्ये झालेल्या फाईटमध्ये गुणांवर मात करत शिवाजी गेडाम याने जिंकली. शिवाजीने चार गुण मिळवले. पुण्याच्या अजिंक्य गायकवाड आणि जळगावच्या धीरज सोनावणे यांच्यातील लढतीत पुण्याच्या अजिंक्यने लढत जिंकली. 49 ते 52 किलो वजनी गटात सांगलीच्या निखिल शेंडगे आणि औरंगाबादच्या कृष्णा राऊत यांच्यात झालेल्या लढतीत दुसर्‍या राऊंडलाच सांगलीच्या शेडगेने विजय मिळवला. अकोला शहराचा राम अरेव्हर आणि औरंगाबाद शहराच्या सुरज शेवाळे यांच्यात झालेल्या लढतीत सुरजने दुसर्‍या राऊंडला विजय मिळवला. पुणे शहराचा सनम सय्यद आणि नंदूरबारचा प्रथमेश मराठे यांच्यातील लढतीत गुणांवर सय्यद याने विजय मिळवला. क्रीडा प्रबोधिनीच्या अजय पेंडार आणि परभणीच्या दीपक तडवी यांच्यात झालेल्या लढाईत अजय पेंडार याने चांगली फाईट करत पहिल्याच फेरीत विजयी झाला. पुण्याच्या स्वप्निल शिंदे आणि पालघरचा कसीम अन्सारी यांच्यातील लढतील गुणांवर स्वप्निलने मात केली. 52 किलो वजनी गटात  पालघरच्या श्याम गुप्ता आणि क्रीडा प्रबोधिनीच्या विशाल नुपे यांच्यात फाईटमध्ये विशालने पाच गुण मिळवत विजय मिळवला. नंदूरबारच्या नुकूल चौधरी यांच्यासोबत मुंबईच्या अब्दुल अन्सारी यांची फाईट झाली. त्यामध्ये दुसर्‍या राऊंडला अन्सारी जिंकला. पुणे शहरचा रोहित चव्हाण आणि औरंगाबादच्या मुस्तकीन शेख यांच्यातील लढतीत दुसर्‍या फेरीत शेख जिंकला. जळगावच्या कल्पेश बुद्दगुजर आणि सातार्‍याच्या सौरभ राजे यांच्यामध्ये झालेल्या फाईटमध्ये गौरब राजेनी एकहाती लढत जिंकली. 56 ते 60 किलो वजनी गटात जळगाव शहराचा रोशन शर्मा आणि सातार्‍याचा करण शिंदे यांच्यात लढत झाली. करणने सुरुवातीपासून एकहाती विजय मिळवला. जळगावच्या सागर अडाळे आणि पुणेच्या केशव हंस यांच्यामध्ये झालेल्या लढतीत गुणांवर हंस जिंकला. क्रीडा प्रबोधिनीच्या कैलास जाधव आणि अहमदनगरचा कृष्णा विधाते यांच्यातील लढतीत कृष्णाने पहिल्याच फेरीत विजय मिळवला. पुणे शहरचा अथर्व खत्री आणि मुंबईच्या साकेत मोरे यांच्या फाईटमध्ये अथर्वने 5 गुण मिळवत विजय मिळवला. 60 ते 64 किलो वजनी गटात सातारच्या स्वप्निल साळवी आणि क्रीडा प्रबोधिनीच्या तुषार बीषाने याच्यातील लढतीत दुसर्‍या फेरीत तुषारने साळवीला हरवले. मुंबईच्या अभिषेक आव्हाड आणि जळगावच्या अशरफ गवळी यांच्यातील लढतीत गुणांवर अभिषेक जिंकला. सोलापूरच्या शुभम कुसुगावकर आणि औरंगाबादच्या उदयराज पवार यांच्यातील लढतीत शुभमने लढत जिंकली.
सातार्‍याच्या राजे अन्
शिंदेची आक्रमक खेळी
फलटण तालुक्यातील करण शिंदे आणि सौरभ राजे हे सातारा बॉक्सिंग असोसिएशनच्या दोन बॉक्सरनी आतापर्यंत दिमाखादार पंच लगावत समोरच्या बॉक्सरना परतीचा रस्ता दाखवला. करण शिंदे याने तर दोन्हीही फाईटमध्ये समोरच्या बॉक्सरला सुरुवातीपासून अप्पर आणि लोअर अशा प्रकारचे ठोसे लगावत तेंडही वर काढू दिले नाही. त्यामुळे दोन्हीही वेळेला त्याने पहिल्याच फेरीत विजय मिळवला. त्या दोघांनाही सातारा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रशिक्षक  आंतरराष्ट्रीय कोच सागर जगताप, विनोद दाभाडे, टीम मॅनेजर साजिद शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.  
मान्यवरांच्या भेटी वाढल्या
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेला अध्यक्ष राजेंद्र चोरगे, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, कार्याध्यक्ष रवींद्र झुटिंग, योगेश मुंदडा यांच्याकडून कुठेही कमतरता होत नाही. सातारकरांकडून प्रतिसाद मिळत आहे. सातार्‍यातील उद्योजक अस्लमभाई तांबोळी, नरेंद्र पाटील, सचिन जवळकोटे, निशांत पाटील, उत्तमराव माने, प्राजार्य शेजवळकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, सुजाता गिरीगोसावी, पत्रकार हरीष पाटणे, जीवनधर चव्हाण यांनी भेट दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: