Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आयलँडच्या आरक्षित जागेचा रहिमतपूर पालिकेने घेतला ताबा
ऐक्य समूह
Saturday, January 06, 2018 AT 11:37 AM (IST)
Tags: re4
जेसीबीद्वारे दुकाने व घरे जमीनदोस्त
5रहिमतपूर, दि. 5 : रहिमतपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या ट्रॅफिक आयलँडच्या आरक्षित जागेचा तहसीलदार स्मिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष जागेचा ताबा घेतला. दरम्यान, जेसीबीच्या साह्याने व्यावसायिकांची दुकाने व घरे पाडण्यात आली.
गेली कित्येक वर्षे चर्चेत असणार्‍या गांधी चौकातील आरक्षित ट्रॅफिक आयलँडची जागा खाली करण्यास व्यावसायिकांच्या विनंतीवरून प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून दि. 29 डिसेंबर रोजी एक आठवड्याची मुदत दिली होती. 
त्यानुसार शुक्रवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता जागेचा ताबा घेण्यासाठी तहसीलदार, नगरभूमापन व पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. कारवाई दरम्यान सर्व मिळकतधारकांचे पंचनामे करण्यात आले. सातारा सहाय्यक नगररचनाकार दिलीप कुलकर्णी, आनंद कांबळे, रहिमतपूर नगर भूमापनचे भूमापक गणेश कुंभार, पोलीस पाटील दीपक नाईक, तलाठी पी.जी. सदावर्ते, ए.एल.घोरपडे, आर. एम. घोरपडे, महेश पाटील, शिंदे, मोनाली चव्हाण, मंडलाधिकारी एम.जी.पाटोळे, पालिका कर्मचार्‍यांनी भाग घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, नगरसेवक विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, सर्व व्यावासायिक उपस्थित होते. रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. जे. माने, पोलीस नाईक पी. सी.गायकवाड यांच्यासह महिला पोलीस शिपाई जाधव, घाडगे या कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: