Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सुरुची प्रकरणातील एका गुन्ह्यात सहा जणांना जामीन
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: lo2
तिसर्‍या गुन्ह्यातील दोषारोपपत्र दाखल
5सातारा, दि. 12 : सुरुची राडा प्रकरणातील आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावासह त्यांच्या समर्थकांचा समावेश असलेले तिसरे दोषारोपपत्र  जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आमदार गटाच्या सहा जणांना एका प्रकरणात नियमित जामीन मंजूर झाला आहे.
सुरुची राडा प्रकरणात नुकतेच दोन दोषारोपपत्र दाखल झाली होती. आता तिसरेही दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तिसर्‍या गुन्ह्याचा तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव हे करत होते. आ. शिवेंद्रराजेंसह त्यांच्या समर्थकांविरुध्द अजिंक्य मोहिते याने तक्रार दिली आहे.  
तिसर्‍या गुन्ह्याचे दोषारोपपत्र सुमारे 100 पानांपेक्षा अधिक असून दोन दिवसांपूर्वीच ते दाखल केले आहे.
सुरुची राडा प्रकरणातील अटकपूर्व व नियमित जामीनाचा अर्ज दाखल करण्यासाठी आता संशयितांच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चेतन सोळंकी, निखिल सोडमिसे, हर्षल चिकणे, प्रतीक शिंदे, उत्तम कोळी, निखिल वाडकर या सहा जणांनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांचा  जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन अजिंक्य मोहिते याने केलेल्या फिर्यादीच्या गुन्ह्यात मिळाला आहे. घटना घडल्यानंतर संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वीच अटक केली होती. मात्र या सर्वांना पोलीस तक्रारदार असलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन मिळाला नसल्याने सध्या तरी या संशयितांची रवानगी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: