Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचगणीतील इंग्रजी शाळेत शिकणार्‍या आदिवासी मुलाचा मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: re2
5पाचगणी, दि. 12 : येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत  आदिवासी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शासनाच्या आदिवासी प्रकल्पांतर्गत आदिवासी मुले शिकण्यासाठी आहेत.  
या शाळेतील चौथीमध्ये शिकणारा राकेश रामा भवर (वय 9), (रा. मणिपूर, पो. गंजाड, ता. डहाणू, जि. पालघर) हा विद्यार्थी आजारी होता. त्याला ताप येत असल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले. परंतु तो उपचाराला साथ देत नसल्याचे लक्षात आल्याने राकेशला पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी राकेश मृत झाल्याचे घोषित केले.  याबाबत शिक्षक केतन विजय हगवणे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तशी खबर दिली. पाचगणीच्या सपोनि. तृप्ती सोनावणे व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: