Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
औरंगाबाद येथून बेपत्ता झालेली नवविवाहिता सातार्‍यात सापडली
ऐक्य समूह
Saturday, February 10, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 9 :  औरंगाबाद येथील मुकुंदनगर येथून बेपत्ता झालेल्या नवविवाहितेचा सातारा बसस्थानक पोलीस चौकीतील जवानांनी शोध लावला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, औरंगाबाद येथील मुकुंदनगर येथून नवविवाहिता बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या बहिणीने  मुकुंदनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ही नवविवाहिता सातार्‍यात आल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती सातारा पोलिसांना कळवली. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: