Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 10:56 AM (IST)
Tags: mn2
5नागपूर, दि. 11 (वृत्तसंस्था) : शेतकरी धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचार्‍यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
2002 मध्ये या चौघांना पालिकेच्या सेवेतून बडतर्फ केले होते. त्यांना पालिका प्रशासनाने पुन्हा सेवेत घेतले नाही. त्यानंतर या कर्मचार्‍यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. हे चौघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. त्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी त्याला रोखले. तसेच त्याच्यासह आलेल्या इतर तीन कर्मचार्‍यांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी या चौघांनाही वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: