Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाहन चालकांसाठी खूशखबर पेट्रोलच्या किमती कमी होण्याची शक्यता?
ऐक्य समूह
Tuesday, February 13, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : तब्बल 7 महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले होते. मागच्या 7 महिन्यांमध्ये पेट्रोल 9 रुपये महाग झाले. पण आता कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलची किंमत 2 रुपयांनी कमी होऊ शकते.
येत्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 62 डॉलर प्रती डॉलरपर्यंत कमी होऊ शकतात, असे बोलले जात आहे. जर असे झाले तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती 7 महिने जुन्या दरावर पोहोचतील. म्हणजेच या किंमतीमध्ये 2 रुपयांची कपात होईल.
21 पैसे स्वस्त झाले पेट्रोल
मागच्या दोन दिवसांमध्ये पेट्रोल 21 पैसे आणि  डिझेल 28 पैशांनी कमी झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 80.87 रुपये तर डिझेल 67.75 रुपये प्रती लीटर आहे.डिसेंबरनंतर कच्च्या तेलाच्या किंमती 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. अमेरिका तसेच ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवले आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. या सगळ्यांचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमती कमी होण्यात झाली आहे.
महागाईवरही लगाम लागणार पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले तर महागाईही कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल महाग झाल्यामुळे कच्चा माल, भाजी, फळे यांच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. इंधनाच्या किंमती कमी झाल्या तर या सगळ्यांचे भाव कमी व्हायला मदत होते. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: