Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रॅक्टरच्या धडकेत भांबेतील एक ठार
ऐक्य समूह
Wednesday, February 14, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re2
5उंब्रज, दि. 13 : इंदोली-चोरे रस्त्यावर इंदोली, ता. कराड गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 12) रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मधुकर रामचंद्र सोनटक्के (वय 47, रा. भांबे) हे ठार झाले. या अपघाताची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत माहिती अशी, मधुकर सोनटक्के हे इंदोली-चोरे रस्त्याने भांबे येथे घराकडे  सोमवारी सायंकाळी चालत निघाले होते. त्यावेळी इंदोलीकडून चोरेकडे जाणार्‍या ट्रॅक्टरने सोनटक्के यांना पाठीमागून जोराची धडक दिली. अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा अमित सोनटक्के याने उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी जगताप तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: