Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गंजीला लागलेल्या आगीवरून शिंदेवाडी येथे दोन गटात वादावादी
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 11 : शेतकर्‍यांनी घराच्या पाठीमागे लावलेल्या गंजींना मंगळवारी सायंकाळी आग लागली. ही घटना शिंदेवाडी, ता.सातारा येथे  घडली. आग लागल्यानंतर  तेथील दोन गटात वादावादी झाली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत दिनकर लक्ष्मण शिंदे यांनी दिलेल्या  तक्रारीत म्हटले आहे, की उमा हिंदुराव शिंदे, हिंदुराव बळीराम शिंदे, ऋषिकेश हिंदुराव शिंदे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून कडब्याच्या गंजीस आग लावल्याचे व त्यात गंज, लाकडे, मांडवाचे साहित्य जळून तसेच दोन बैल भाजून सुमारे 1 लाख 80 हजारांचे नुकसान झाले आहे.   
दुसर्‍या गटातून हिंदुराव बळीराम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की चारचाकी तसेच घरासमोरील जागेत वाळत टाकलेल्या ज्वारीस आग लावल्या प्रकरणी मी गावातील काही जणांवर तक्रार नोंदवली आहे. मंगळवारी सायंकाळी गंजीस आग लागल्यानंतर ती विझवण्यास निघालो होतो. यावेळी लक्ष्मण रामचंद्र शिंदे, दिनकर लक्ष्मण शिंदे, रामचंद्र लक्ष्मण शिंदे, अक्षय लक्ष्मण शिंदे यांनी अडवत मारहाण केली. त्यामुळे पळत येवून घरात शिरलो असता आरोपींनी येवून घराच्या दाराची आणि इतर साहित्याची तोडफोड केली आहे. दोन्ही तक्रारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: