Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
9 दुचाकी चोरणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 13 :  सातारा शहर परिसरातून 2 लाख 82 हजार रुपये किमतीच्या 9 दुचाकी चोरणार्‍या अभिजित उर्फ राहुल राजाराम लोहार (रा. सोमवार पेठ, सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, आणखी काही दुचाकींची चोरी संशयिताने केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्या दुचाकींची चोरी झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातील एस. टी. स्टँड, राजवाडा, जिल्हा रुग्णालय व कराड परिसरातून गेल्या काही दिवसात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वारंवार दुचाकी चोरी होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याची माहिती घेतली असता अभिजित उर्फ राहुल लोहार याचे नाव समोर आले. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सातारा एस. टी. स्टँड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित (क्र. एम. एच. 11- ए. व्ही. 2763) या दुचाकीवरुन फिरत होता. पोलिसांना संशयित राहुल लोहार याचा संशय आल्याने त्याला बाजूला घेवून चौकशी केली. प्राथमिक चौकशीमध्ये तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात आणल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. संशयिताने त्या दुचाकीबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या सर्व दुचाकी जप्त केल्या. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार विलास नागे, संजय पवार, जोतिराम बर्गे, मोहन नाचण, रवींद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, संतोष जाधव, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: