Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूजचे उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांच्यावरील अविश्‍वास ठराव मंजूर
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: re4
14 नगरसेवक ठरावाच्या बाजूने; तिघे गैरहजर
5वडूज, दि. 16 : वडूजचे उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांच्यावरील अविश्‍वास ठराव सोमवारी झालेल्या विशेष सभेत 14 विरुद्ध 3 मतांनी मंजूर झाला.
नगराध्यक्षा शोभा माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत 14 नगरसेवक उपस्थित होते तर उपनगराध्यक्षांसह दोन नगरसेविका गैरहजर होत्या. मंगळवार, दि. 10 रोजी 12 नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष अविश्‍वास ठरावाबाबत विशेष सभेच्या आयोजनाबद्दलचे लेखी निवेदन नगराध्यक्षा शोभा माळी यांना दिले होते. त्याप्रमाणे नगराध्यक्षा शोभा माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत 14 नगरसेवकांनी या अविश्‍वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष संदीप गोडसे यांच्यावरील अविश्‍वास ठरावाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. दहा दिवसात नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अजेंडा काढला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: