Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रकच्या चाकाखाली सापडून महिला ठार
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 16 : ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना कराडमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नसीमा बालम मुलाणी (वय 55, बुधवार पेठ, दडगे हॉस्पिटल मागे, कराड ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. विजय दिवस चौकातील सिग्नल सुटल्यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार, सौ. नसीमा मुलाणी या पतीसमवेत दुचाकीवरून मार्केट यार्डकडे निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी विजय दिवस चौकात आली असता स्टेशन रस्त्याकडून एक ट्रक आला. स्टेडियमकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला त्या ट्रकचा धक्का लागून दुचाकी थेट ट्रकखाली आली. त्यात नसीमा बालन मागील चाकाखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती बचावले आहेत. अपघातानंतर तेथे गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: