Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रायगाव फाट्याजवळ अपघातात एक ठार, तीन जखमी
ऐक्य समूह
Tuesday, April 17, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 16 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाटा येथे ट्रेलरला पिकअपने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. संजय केशव निकम (वय 48, रा. पलूस, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव फाट्याजवळ सातारा तालुका हद्दीत पुण्याहून सांगलीकडे भरधाव वेगात निघालेल्या पिकअप (एमएच-10-एडब्ल्यू-3721) वरील चालकाचा ताबा सुटून तिने समोर असलेल्या ट्रेलरला (आरजे-19-जीई-1659) पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, पिकअपचा पुढील भाग ट्रेलरच्या मागील भागात अडकला होता. या अपघातात शंकर बाबूराव जाधव (वय 42, रा. मालदेववाडी, ता. वाई), संजय रामचंद्र गोडसे (वय 38, रा. वडगाव धायरी, पुणे),  काळूराम ज्ञानेश्‍वर जाधव (वय 54, रा. काजळे, ता. भोर, जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: