Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रेमविवाहानंतर काळोशीमध्ये मुलाच्या कुटुंबीयांना सैराट मारहाण; चार जखमी
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 :  प्रेमी-युगुलाने विवाह केल्यानंतर चिडलेल्या मुलीच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी मुलाच्या कुटुंबीयांना कुर्‍हाड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना मु. काळोशी, पो. अंबवडे, ता. सातारा येथेे घडली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर जखमींवर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये लक्ष्मण लामजे, सुरज लामजे, पंकज लामजे, ऋषिकेश शेलार, अनिकेत डफळ, प्रवीण लोंढे यांच्यासह 15 जणांचा समावेश आहे. 
 या प्रकरणी अमोल उत्तम निकम (रा. काळोशी) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत तक्रारदारासह चार जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या भावाने संशयित लक्ष्मण लामजे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला. या घटनेची माहिती लामजे कुटुंबीय व नातेवाइकांना समजल्यानंतर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास  संशयितांनी कुर्‍हाड, लाकडी दांडक्याने निकम कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एका महिलेसह चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीत जखमींनी प्रेमविवाह करण्यास पाठिंबा दिल्याने चिडून मारहाण झाली केली असल्याचे म्हटले आहे. सातारा तालुका पोलिसांनी रुग्णालयात व घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
 

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: