डेळेवाडी येथे अपघातात एक ठार
ऐक्य समूह
Thursday, May 17, 2018 AT 11:12 AM (IST)
5कराड, दि. 16 : मोटार-सायकलवरून आईस्क्रीम विक्री करण्यासाठी गेलेल्या हणमंत जगन्नाथ जाधव (वय 45, रा. साकुर्डी, ता. कराड) यांचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी डेळेवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत हणमंत जाधव हे मोटारसायकलवरुन आईस्क्रीम विकायला गेले होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या छोटा हत्ती टेंपोने (एमएच-11-एजी-5179) जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.