Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदार निलंबित
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo3
बेजबाबदारपणे काम केल्याचा आरोप
5सातारा, दि. 13 :  कर्तव्यचुती, बेशिस्त व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून फलटण शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस हवालदारांना  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी  निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या पोलिसांची किशोर हणमंत गिरी व नितीन दिलीप चतुरे अशी  नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस हवालदार किशोर गिरी हे मलटण बीटमध्ये कर्तव्य बजावत आहेत तर नितीन चतुरे हे गुन्हे तपास पथकात काम करत आहेत. मलटण बीट व फलटण शहरात अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केल्या आहेत. याशिवाय अरुण उर्फ गब्बर माणिक जाधव हा तडीपार असतानाही तो अपरात्री येवून नागरिकांना दमदाटी करत असल्याचेही समोर आले आहे.    
त्यामुळे अवैध सुरू असलेले धंदे व तडीपारीतील संशयितांचा बिनधोकपणे सुरू असलेला वावर या गंभीर बाबी आहेत. या सर्व बाबींचा दोन्ही पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांना बुधवारी पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केले. निलंबनाच्या कारवाईनंतर दोन्ही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत या दोन्ही पोलिसांचे मुख्यालय ढेबेवाडी देण्यात आले आहे.
 अशाप्रकारे बेशिस्त वागणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: