Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेबाबत पवारसाहेब सर्व आमदारांना विचारात घेवून निर्णय घेतील
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: lo5
मीही उमेदवाराचा शोध घेतोय; खा. उदयनराजेंचे प्रेम कधी कधी उतू जाते
5सातारा, दि. 13 : दिल्लीत जाण्यापेक्षा मी माझ्या सातारा-जावली मतदारसंघातच ठीक आहे. त्यापेक्षा सातार्‍यातील शुक्रवार पेठेतून  मी नगरसेवक होईल. लोकसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवार सर्व आमदारांना विश्‍वासात घेवून योग्य निर्णय घेतील. जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र तरीही मी उमेदवार कोण असावा याचा शोध घेतोय आणि अभ्यास करतोय, अशी माहिती आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान खा. उदयनराजेंचे प्रेम कधी कधी उतू जाते. मात्र त्यांची भूमिका ही ओठात एक अन् पोटात एक अशी असते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही आपले सातार्‍यातच बरे आहोत.   
सातार्‍यातूनच मी आमदार होईन, मला खासदार होण्याची इच्छाही नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आमचा विश्‍वास आहे. ते सर्व आमदारांचे मत घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. पवारसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.   राजकारणातील ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व  असल्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. वाढदिवसानंतर खासदार उदयनराजेंचा तुम्हाला फोन आला होता का, यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, त्यानंतर एकदाही त्यांचा फोन आला नाही किंवा त्यांची भेट झालेली नाही. इथेही नाही आणि बाहेरही ते मला भेटले नाहीत. अमिताभ बच्चनला सातार्‍यात आणून पालिकेतील स्वच्छ कारभार दाखवायचा होता का, तरीही बच्चन सातार्‍यात का आले नाहीत या प्रश्‍नावर ते म्हणाले, मी काय अभिषेक बच्चन नाही बच्चन का आले नाहीत हे सांगायला, असेही त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: