Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सांगली येथे सापडलेल्या बनावट नोटा
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: lo2
प्रकरणात सातार्‍यातील संशयिताला अटक
संशयिताचे  शुभम खामकर नाव : एलसीबीची कारवाई
5सातारा, दि. 13 : सांगली येथील हॉटेलसमोर पाचशे रुपयांच्या सतरा आणि दोन हजार रुपयांच्या चार अशा एकूण 21 बनावट नोटा महात्मा गांधी पोलीस चौकीतील पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या प्रकरणी मिरज येथील एका संशयिताला अटक करण्यात आली होती.  याच प्रकरणात सातार्‍यातील शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एका हॉटेलसमोरील बँकेजवळ गौस गब्बार मोमीन (वय 21, रा. आझाद कॉलनी, भारतनगर, मिरज) हा संशयितरीत्या फिरत होता. त्याला सोमवारी रात्री ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या सतरा नोटा सापडल्या.    
त्या नोटा त्याने सातार्‍यातील मित्र शुभम खामकर याने दिल्याचे चौकशीत सांगितले. मात्र या नोटा बनावट असल्याचे  मोमीन याला माहीत होते. या नोटा खपवण्यासाठीच त्याला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सातारा पोलिसांना शुभम खामकरबद्दल माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुभम खामकरला अटक केली. या प्रकरणी हवालदार सुभाष पाटील यांनी तक्रार दिली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: