Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्याध्यापकाला मारहाण प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक
ऐक्य समूह
Thursday, June 14, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 13 :  शासकीय विश्रामगृहामध्ये  मुख्याध्यापकाला मारहाण करून एक प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात  विकास शिवाजी राठोड (वय 25, रा.पंताचा गोटा) या चौथ्या संशयित आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वी तिघा भाजप-शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ते तिघेही सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (जेल) आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 16 मे रोजी दुपारी बारा वाजता या प्रकरणातील तक्रारदार मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना   भाजपचे सुनील काळेकर, संदीप मेळाट व शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे व एका अनोळखीने शासकीय विश्रामगृहातील  9 नंबरच्या खोलीमध्ये एक प्रकरण मिटवण्यासाठी मारहाण करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. भाजप-सेना पदाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकाला मारहाण केल्याने खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर दि.31 रोजी सुनील काळेकर, संदीप मेळाट, हरिदास जगदाळे यांना अटक केली. सुरुवातीला या तिघांना पोलीस कोठडी मिळाली असून सध्या जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक अनोळखी असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. विकास राठोड हा चौथा संशयित असल्याचे समोर आल्यानंतर दि. 12 जून रोजी त्यालाही पोलिसांनी अटक केली. अशाप्रकारे आतापर्यंत चारही संशयितांना अटक झालेली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: