Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संभाजीनगर येथे युवतीची आत्महत्या
ऐक्य समूह
Wednesday, July 11, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 10 : संभाजीनगर येथील घरात मंगळवारी दुपारी प्रतीक्षा पांडुरंग तोडकर (वय 22, रा. संभाजीनगर, सातारा) हिने  गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती पोलीस रात्री उशिरापर्यंत घेत होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, संभाजीनगरातील शिवराज पेट्रोलपंपा-मागे प्रतीक्षा तोडकर ही युवती कुटुंंबीयांसमवेत राहण्यास होती. प्रतीक्षा सातारा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला होती. मात्र मंगळवारी कंपनीला सुट्टी असल्याने ती घरीच होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरातील एका खोलीत गेली. खोलीतून बराच वेळ काहीही हालचाल न जाणवल्याने आईने दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद आतून मिळाला नाही. त्यानंतर प्रतीक्षाच्या भावाने बाहेरुन जात खिडकीतून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे आढळले.  परिसरात नागरिकांची गर्दी झाल्यानंतर गळफास काढून तिला उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: