Dainik Aikya - काश्मीरमध्ये चकमकीत 4 दहशतवादी ठार
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये चकमकीत 4 दहशतवादी ठार
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: na2
5श्रीनगर, दि. 8 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रफियाबादच्या वनक्षेत्रात सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. परिसरात आणखी एक दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराच्या हाती लागली आहे. या दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसराला घेरले आणि शोधमोहीम सुरू केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानातून आलेल्या दोन दहशतवाद्यांना यापूर्वी जवानांनी ठार केले होते. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये लष्कराच्या कारवाईत मेजर कौस्तुभ राणे आणि तीन जवान शहीद झाले होते.            
या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील सर्व भागांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा चकमक झाली. बारामुल्ला-उरी मार्गावर ‘अन्सार गजवतुल हिंद’च्या दहशतवाद्याला आज ग्रेनेडसह अटक करण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: