Dainik Aikya - दुचाकीच्या धडकेत वर्ये येथे एकाचा मृत्यू
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दुचाकीच्या धडकेत वर्ये येथे एकाचा मृत्यू
ऐक्य समूह
Thursday, August 09, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 : वर्ये, ता.सातारा येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीची धडक बसल्याने मारुती कोंडिबा चिंचकर (रा.वर्ये) हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकी चालक राजेंद्र रमेश शिंदे (रा.किडगाव, ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुशांत विठ्ठल जाधव (रा.वर्ये) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: