Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड पालिकेच्या आवारात टेंडवरून धुमश्‍चक्री
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: re1
नगरसेवक व नगरसेविकेचे समर्थक भिडले
5कराड, दि. 10ः कराड नगरपालिकेच्या आवारात देखभाल दुरुस्तीचे टेंडर कोणी घ्यायचे यावरून एक नगरसेवक व एका नगरसेविकेच्या समर्थकांमध्ये जोरदार मारामारी झाली. यामध्ये काही युवकांनी तलवारी, चाकू काढल्याची चर्चा होती. उपनगराध्यक्ष, इतर नगरसेवक, मुख्याधिकार्‍यांच्या मध्यस्थीमुळे वादावादी मिटवण्यात आली. या घटनेमुळे नगरपालिकेत तणावपूर्ण वातावरण होते.
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या केबिनसमोर शुक्रवारी दुपारी 1 च्या दरम्यान एक नगरसेवक, एका नगरसेविकेचा दीर व इतर नगरसेवकांची चर्चा सुरू होती. त्यात एका टेंडरचा विषय होता. या चर्चेतून नगरसेवक व टेंडर घेण्यासाठी इच्छुक असणार्‍या एका नगरसेविकेचा दीर यांची बाचाबाची झाली. त्यानंतर ते दोघेही केबिनच्या बाहेर आले. तेथे बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: