Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
किसनवीरवर ‘कोकण सम्राट’ आम्रवृक्षाची लागवड
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: re4
5भुईंज, दि.10 : किसनवीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी कोकण सम्राट आंब्याची लागवड ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल..’ च्या गजरात करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक ह. भ. प. विजय चव्हाण, पंढरपूरहून आवर्जून आलेले वारकरी व शेतकरी जैनवाडी (ता. पंढरपूर) सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गोफणे, ग्रामपंचायतीचे सदस्य भीमराव लिंगळे, सोसायटीचे माजी चेअरमन दादा दाणोळे, ह.भ.प. विठ्ठल शिंदे, नारायणराव सकुंडे, नानासाहेब सकुंडे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सांगली येथील पार्वती अ‍ॅग्रो प्लॉस्टचे  प्रमोद सारडा, शेखर भोसले-पाटील, किशोरकाका बाबर, राहुल तांबोळी, हणमंतराव गायकवाड, शंकर खोत, आनंद जाधवराव, हणमंत मगर, विशाल सावंत, अक्षय बाबर, विक्रम दुधे-पाटील, यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी हापूस (अल्फान्सो) व अमेरिकन-मॅक्सिकन व्हरायटी टॉमीअ‍ॅटकीन्स या आम्रवृक्षाच्या संक्रमणातून कोकण सम्राट ही नवीन आंब्याची जात विकसित केली आहे. ही नवीन आंब्याची जात दरवर्षी फळे देणारी असून साका विरहित आहे. तसेच या जातीची फळे हापूस आंब्यापेक्षाही अधिक मधुर असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. विशेषत: या जातीच्या आंब्याची झाडे वातावरणातील कमालीचे बदल खास करून 42 सेंटिग्रेड या तापमानामध्ये उत्तम टिकाव धरणारी आहेत.  ही हायब्रीड व्हरायटी आंबा फळ लागवडीत एक नवी क्रांती घडवेल, असाही दावा विद्यापीठाकडील तज्ञांकडून करण्यात येत आहे.
किसन वीर कारखान्यामध्ये केशर, हापूस, रत्ना, तोतापुरी, सिंधू, आम्रपाली इत्यादी आंबा जातीची 7  हजार 800 वृक्ष लावण्यात आली आहेत. ही सर्व फळझाडे गेल्या तीन-चार वर्षांपासून उत्पादनही देऊ लागली आहेत. कृषिदिनाचे औचित्य साधून गेल्या बारा वर्षांमध्ये शेतकर्‍यांच्या सहभागातून सुमारे 2 लाख 25 हजार फळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये आंब्याच्या वृक्षांची सुमारे पन्नास टक्के पेक्षाही अधिक लागवड करण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठ व किसनवीर परिवार यांच्यातील सातत्यपूर्ण संपर्क स्नेहपूर्वक संवाद यामुळेच किसन वीर कारखान्यास विशेष बाब म्हणून ही रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: