Dainik Aikya - विक्रेत्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एकास अटक
 
Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विक्रेत्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एकास अटक
ऐक्य समूह
Saturday, August 11, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 10 :  येथील विक्रेत्याचे अपहरण करुन त्याला खंडणी मागणार्‍या अजमिर अकबर मुल्ला (वय 27, रा. नागठाणे, ता. सातारा) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता  दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  संशयिताकडून पोलिसांनी दोन चारचाकीही जप्त केल्या असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे.
याबाबत फरजाना मुनीर पट्टणकुडे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फरजाना यांचे पती मुनीर यांनी पुणे येथील व्यावसायिकांशी होलसेलमध्ये एलईडी बल्बची एजन्सी घेतली होती. या व्यवहारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यानुसार एजन्सी, कमिशन ठरले होते. मात्र असे असतानाही मुनीर पट्टणकुडे याच्याकडे पैसे बाकी राहिले असल्याचे पुणे येथील विकास म्हस्के याचे म्हणणे होते. त्यातूनच संशयितांनी सातार्‍यातून मुनीर पट्टणकुडे याचे अपहरण केले व त्याला कारमधून घालून नेले. धमकी देवून पैशांची मागणी करुन त्यांना सोडून देण्यात आले. या घटनेची माहिती मुनीर यांनी पत्नीला दिल्यानंतर त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरु असताना अजमिर मुल्ला याला शहर पोलिसांनी अटक केली. अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान शहर पोलिसांनी याप्रकरणी दोन कारही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी  पाच ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून इतर संशयितांचा शोध सुरु आहे. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर कडव व सीताराम वाघमळे तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: