Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आशियाई स्पर्धेची उत्साहात सांगता;
ऐक्य समूह
Monday, September 03, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: sp1
2022 ला चीनला भरणार कुंभमेळा
5जकार्ता, दि. 2 (वृत्तसंस्था) : पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी उत्साहात आणि आकाशात शोभेची दारू उडवून सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला.
भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले. भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकूण 69 पदकांची कमाई करताना आठवे स्थान पटकावले.  महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने निरोप समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. ध्वजधारकाचा मान तिला देण्यात आला होता.
पदकांच्या क्रमवारीत चीनने पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केली. चीनने 289 (132 सुवर्ण, 92 रौप्य व 65 कांस्य) पदक त्यापाठोपाठ जपान 205 (75 सुवर्ण, 56 रौप्य व  74 कांस्य) आणि दक्षिण कोरिया 177 (49 सुवर्ण, 58 रौप्य व 70 कांस्य) पदकांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर इंडोनेशिया (98 पदकं), उझ्बेकिस्तान (70), इराण (62) आणि चायनीज तैपेई (67) यांनी स्थान पटकावले आहे. यावेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी सर्व खेळाडूंचे आभार मानले. पुढील आशियाई स्पर्धा 2022 मध्ये चीनमधील हँगझाऊ शहरात होणार आहे. 10 ते 25 सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: