Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीरमध्ये 250 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत
ऐक्य समूह
Monday, October 08, 2018 AT 11:25 AM (IST)
Tags: mn3
5श्रीनगर, दि. 7 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या एक दिवस आधी पाकिस्तानद्वारे गोंधळ घालण्याचा कट शिजत आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खोर्‍यात सुमारे 300 दहशतवादी सक्रिय आहेत आणि सुमारे 250 दहशतवादी लॉन्चपॅडवर सीमेपलीकडून घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
काश्मीरमध्ये घुसखोरी करत दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात हे अतिरेकी असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. यानंतर भारतीय लष्कर अलर्टवर आहे आणि या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लष्कर, पोलीस, सीआरपीएफसह सर्व दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
दहशतवादी काश्मीर खोर्‍यात घुसू नयेत यासाठी लष्कराने टेहळणी, तपास वाढवला आहे. निवडणुका शांततेत, निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
सोमवारी चार टप्प्यात मतदान होणार आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून गाड्यांच्या तपासणीसह संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. चेक पॉइंटसची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: