Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
म’श्‍वर येथे अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक प्रकरणी लाखाचा दंड
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: re4
5पळशी, दि. 8 : माण तालुक्यातील वाळू तस्करी मध्यंतरी थंडावली असली तरी पुन्हा वाळू तस्करांनी डोके वर काढले आहे. शनिवारी पहाटे एका महिला अधिकार्‍याने म्हसवडमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. तो ट्रक कारवाई करून म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये नेला. मात्र, तेथे मोठी तोडपाणी झाल्यानंतर ट्रक सोडून देऊन वाळू नसलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणून लावला. या प्रकरणाची चर्चा म्हसवड परिसरात खुमासदारपणे सुरू आहे.
शनिवारी पहाटे माणगंगा नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करताना एक ट्रक रंगेहात पकडला. त्या ट्रकवर कारवाई केली जाणार असल्याचे त्या महिला अधिकार्‍याने सांगितले अन् ट्रक म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये आणला.  मात्र, संबंधित वाळू तस्कराने मी नुकताच बबलू नामक व्यक्तीकडे मंथली दिल्याचे सांगितले व सदर ट्रकवर पहिलेच लाखो रुपयांचे बंदपत्र केले आहे. ट्रक सोडून द्या, काही असेल ते मिटवतो म्हटल्यानंतर त्या अधिकार्‍यांसोबत पूर्वेकडील जिल्ह्यातील वसुलीसाठी असलेल्या दोघांनी मलिदा घेऊन पुन्हा त्याच मालकाचा मोकळा ट्रॅक्टर आणून लावला. कारण ट्रकला जवळपास साडेतीन लाख दंड तर ट्रॅक्टरला दीड लाख दंड आकारला जातो.    
रा. भेकवली याच्याकडून दंडासहित एकूण एक लाख दहा हजार आठशे रुपये वसूल केले. तालुक्यात आल्या आल्या तहसीलदार मीनल कळसकर यांनी बेकायदा अवैध वाहतुकीवर जरब बसविण्यास सुरुवात केली. पूर्वी महाबळेश्‍वरमध्ये त्या तहसीलदार असताना अशाच प्रकारे अनेकांना बेकायदा गौणखनिज उत्खनन वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी कारवाई करून त्यांचा जरब बसविला होता. असाच त्यांचा पुन्हा झालेला कमबॅक गेल्यावेळीसारखाच गाजणार, अशी चर्चा शहरातून होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: