Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कामेरी येथे वाळू उत्खनन करताना जेसीबी पकडला
ऐक्य समूह
Tuesday, October 09, 2018 AT 11:34 AM (IST)
Tags: re3
5वेणेगाव, दि. 8 : कामेरी, ता.सातारा येथील कृष्णा नदी पात्रात अवैध वाळूचे उत्खनन होत असल्याची खबर मिळाल्यावरून तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी पथकासह नदीपात्रात रविवारी रात्री धाड टाकून एक जेसीबी जप्त केला.
मिळालेल्या माहितीवरून तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी कामेरी, ता.सातारा येथील नदीपात्रात रविवारी रात्री पथकासह धाड टाकून अवैध वाळू उत्खनन करताना एक जेसीबी (क्र.एम. एच 11 यू 4664) जप्त केला. या जेसीबीच्या सहाय्याने संदीप सुगंधराव घाडगे हे अनधिकृतरीत्या वाळूचे उत्खनन करत होते. जप्त केलेला हा जेसीबी बोरगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला आहे. या प्रकरणी साधारण 10 लाख रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. पथकामध्ये मंडल अधिकारी अपशिंगे वैभव सोनावणे, तलाठी कैलास भोसले, तलाठी म्हैसाळकर व निकम यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे यांच्या  यावेळी तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी स्पष्ट केले, की सातारा तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध गौण खनिज कोण उत्खनन करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: